औसा येथे राजरत्न आंबेडकर यांचे स्वागत
औसा: तालुक्यातील औसा येथे राजरत्न आंबेडकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आज दिनांक 2 मार्च 2022 रोजी किल्लारी येथे सुरू असलेल्या विशाल बौद्ध धम्म परिषदेसाठी प्रमुख उपस्थित राहण्यासाठी आगमन केलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू राजरत्नजी आंबेडकर यांचे औशामध्ये जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य कार्यकारिणीचे प्रा किशोर चक्रे,हणमंते, जिल्हाध्यक्ष कुमार सोनकांबळे सचिव रविकांत शिरसाट, महादेव वाघमारे, बी डी उबाळे, औसा तालुका अध्यक्ष मोतीराम कांबळे, मांजरे, वाघमारे आणि माजी सरपंच सुनील बनसोडे, राजेंद्र बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments