महाराष्ट्र महाविद्यालयाच्या रासेयो शिबिरात चारशेच्या वर पशूंची तपासणी व रोगनिदान
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे वार्षिक विशेष शिबिर लांबोटा येथे दिनांक 18 ते 24 मार्च या कालावधीत संपन्न होत असून यादरम्यान गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी आरोग्य तपासणी, रोग निदान व लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ. माने के.एस.व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती. पशू आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन डॉक्टर माने यांच्या हस्ते गायीची पूजा करून करण्यात आले. पशु आरोग्य तपासणी व लसीकरण शिबिरामध्ये गावातील पशूधनाचे संगोपन व संवर्धन करण्याच्या अनुषंगाने व विविध आजारांपासून जनावरांचे संरक्षण व्हावे म्हणून जनावरांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. त्याचबरोबर अनेक छोट्या मोठ्या आजारांवर तज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून औषधोपचार ही यावेळी केले. या पशूंमध्ये एकूण १८५ शेळी व मेंढी ची तपासणी करण्यात आली. तर बैल, गाय, म्हैस लहान वासरे अशी एकूण २६० पशूंचे तपासणी, औषधोपचार व लसीकरण या शिबिरात पूर्ण झाले. या शिबिराच्या उद्घाटन समारंभास लांबोटा येथील भागवत सारगे, वसंत मोरे, दत्ता गडीमे, ज्ञानेश्वर गडीमे, गावातील प्रतिष्ठीत नागरीक, शेतकरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार डॉ. विठ्ठल सांडूर, डॉ. विजय कुलकर्णी, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ लांबोटाचे डॉ. प्रवीण नाणजकर, डॉ. आर. एम. जाधव व सहाय्यक डॉक्टरांची उपस्थिती होती. या शिबिराच्या यशस्वितेसाठी रासेयोच्या शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी परीश्रम घेतले.
0 Comments