महाराष्ट्र महाविद्यालय येथील गणित विभागातील सदानंदे हा JAM परीक्षा तर प्रा. शिंदे या GATE परीक्षा उत्तीर्ण
निलंगा: भारतामध्ये दरवर्षी बी.एस्सी नंतर नावाजलेल्या संस्था जसे कि आय.आय.टी.,सी.एम.आय., एन.आय.टी., केंद्रीय विद्यापीठे इत्यादीमध्ये एम.एस्सी प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर JAM (Joint Admission Test for Masters) ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. तसेच या संस्थेमध्ये एम.एस्सी नंतर पी.एचडी. करण्यासाठी GATE ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्र महाविद्यालय येथील गणित विभागातील बी.एस्सी. तृतीय वर्षातील विद्यार्थी अमरदीप सदानंदे हा JAM परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे आणि निलंगा तालुक्यातील हा एकमेव विद्यार्थी आहे. तसेच महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक रूपाली शिंदे या GATE ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत. या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, संस्था सचिव बब्रुवान सरतापे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम, गणित विभागातील डॉ. सचिन बसुदे, प्रा. भाग्यश्री मंगरूळकर तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी या दोघांच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

0 Comments