Latest News

6/recent/ticker-posts

औशात पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे व सपोनि विलास नवले यांचा सत्कार

औशात पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे व सपोनि विलास नवले यांचा सत्कार



बी डी उबाळे

लातुर: औसा तालुका सुसंस्कृत तालुका असून या दिशेने येणारे लोक संस्कृत होतात. येथील जनतेनी covid काळातही शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करत प्रत्येक उत्सव साजरा केला. राष्ट्रीय एकात्मता व भाईंचाऱ्यांची जपणूक करत जो आदर्श सर्वसमोर ठेवत मराठवाड्यात वेगळी ओळख निर्माण केल्याचे प्रतिपादन पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांनी केले. औशातील प्रशासकीय इमारतीत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती व ब्रिक्स ह्युमन राईटस् मिशनच्या वतीने राष्ट्रपती पथक प्राप्त पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे व भादा ठाण्याचे प्रभारी सपोनि विलास नवले यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापुरकर, पोनि शंकर पटवारी, साहाय्यक पोलीस उपाधिक्षक घोरपडे मॅडम, अँड राणी स्वामी, नेताजी जाधव आदिची उपस्थिती होती पोलिस अधिक्षक पुढे बोलताना म्हणाले समाजकार्याचा वसा घेवून सबंध राज्यात जनसामान्यांसाठी काम करणाऱ्या अ.भा.भ्रष्टाचार निर्मुलन समितीने कधीही हेतू सोडला नाही. त्यांचे कार्य उत्तम असून भविष्यात ही अशाच प्रकारच्या कामाची आपेक्षा आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेवून त्यांच्या समस्येची सोडवणूक केली जाते. लातूर येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक भेटल्यामुळे भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या तीने त्यांचा औसा येथे प्रशासकीय इमारत येथे लातूरचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व भ्रष्टाचार निर्मल संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप खंडापूरकर यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. भादा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले यांचा प्रशासकीय इमारत औसा येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्यूमन राइट्स मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सत्कार करण्यात आला. भादा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या 43 गावांमध्ये त्याने दबंग कामगिरी करत अवैद्य दारू सह इतर अवैध धंदे बंद करून त्यांच्यावर कारवाई केल्याबद्दल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक व प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments