फिरकीचा महान जादूगार काळाच्या पडद्याआड; शेन वॉर्न यांचे निधन
क्रीडा जगत: क्रिकेट विश्वासाठी एक वाईट बातमी आली आहे. फिरकीचा जादूगार असलेल्या शेन वॉर्नचे निधन झाल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे. शेन वॉर्नने भल्या भल्या महान क्रिकेटपटूंना आपल्यापुढो लोटांगण घालायला भाग पाडले होते. मैदानाबाहेरही वॉर्नचे बरेच किस्से ऐकायला मिळाले होते. फिरकीचा जादूगार आणि ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आपल्या फिरकीच्या तालावर दिग्गज फलंदाजांना नाचवणाऱ्या शेन वॉर्नने अखेर या जगाचा ५२व्या वर्षी निरोप घेतला. वॉर्न हा थायलंड येथील कोह सामुई येथे असताना त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती त्याच्या मॅनेजमेंट करणाऱ्या संस्थेने दिली आहे.
0 Comments