एमआयएमचे अफसर शेख यांचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश
शेख बी जी
औसा: दि.4 एमआयएम पक्षाचे प्रभारी तालुकाप्रमुख अफसर शेख यांनी एमआयएम पक्षाला सोड चिट्टी देत राष्ट्रवादी पक्षात मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्रवेश केला.अफसर शेख यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याने लोकनियुक्त नगराध्यक्ष अफसर शेख यांची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. अफसर शेख यांनी एमआयएम पक्षासाठी सतत कार्यशील राहून वेगवेगळी कामे करून पक्षाच्या विकासासाठी काम केले होते. असे अचानक पक्ष प्रवेश केल्याने शहरात उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत आहे. असे आणखीन किती जण नगराध्यक्ष अफसर शेख यांच्या सोबत जाणार आहेत ? या चर्चेला उधाण आले आहे. एकूण पाहता एमआयएम च्या अफसर शेख यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली जाणार असल्याचे बोलले जात आहे. याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला नक्कीच मिळेल अशी चर्चा शहरात आहे. पक्षप्रवेश केल्यामुळे माजी नगराध्यक्ष जावेद शेख, नगरसेवक मुजाहिद शेख, गोविंद जाधव, वकील इनामदार, बाशीद भाई आदीने त्यांचे अभिनंदन केले.
0 Comments