झरी गावच्या ग्रामपंचायत मध्ये महिला दिन उत्साहात
निलंगा: तालुक्यातील झरी गावातील ग्रामपंचायत मध्ये महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.या महिला दिनाच्या कार्यक्रमाला गावच्या सरपंच महानदाबाई, ग्रामसेवक नितीन भोयबर, महिला बालकल्याण गोरे मॅडम, महिला संरक्षण अधिकारी टेंकाळे मॅडम, ग्रामपंचायत ऑपरेटर, अंगणवाडी सेविका, मदतनीस विविध बचत गटातील महिला उपस्थित होत्या. यामध्ये महिलांचा सन्मान सत्कार करून त्यांना शासनाच्या विविध महिलांसाठी योजनांची माहिती गोरे मॅडम यांनी सांगितली.
0 Comments