Latest News

6/recent/ticker-posts

मुलींनी सक्षम होण्यासाठी तायक्वांदो प्रशिक्षण गरजेचे- संतोष नागरगोजे

मुलींनी सक्षम होण्यासाठी तायक्वांदो प्रशिक्षण गरजेचे- संतोष नागरगोजे 


लातुर: दि ०८ मार्च समाजातील विध्वंसक प्रवर्तीच्या घटकांपासून सुरक्षा मिळण्यासाठी व मुलींना सक्षम  होण्यासाठी तायक्वांदो प्रशिक्षण गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेतकरी संघटना प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी लातुर जिल्हास्तर तायक्वांदो निवड चाचणी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले आहे. दि ०६ व ०७ मार्च रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे १४ वी लातुर जिल्हास्तर तायक्वांदो निवड चाचणी स्पर्धा पार पडली या स्पर्धेसाठी लातुर शहर व जिल्हातील १२५ खेळाडुंनी सहभाग नोंदविला होता. सबज्युनियर, कॅडेट आणि ज्युनियर या वयोगटातील हि निवड चाचणी घेण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास अध्यक्ष म्हणून संतोष नागरगोजे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी मदन गायकवाड, लातूर शहर व जिल्हा काँग्रेस सचिव राज क्षीरसागर, ॲड. राहुल कांबळे जिल्हा सञ न्यायालय लातुर, क्रिडा शिक्षक शिवाजी सोमवंशी, तायक्वांदो राष्ट्रीय पंच प्रसाद वारद यांची उपस्थिती होती. जिल्हा क्रीडा अधिकारी मदन गायकवाड यांनी खेळाचे महत्त्व त्याचे शासकीय स्तरावरील फायदे संदर्भात विस्तारित विश्लेषण केले. राज क्षीरसागर यांनी खेळाडूंना प्रोत्साहन पर मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना पदके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.


यावेळी उपस्थित मान्यवर तायक्वांदो राष्ट्रीय खेळाडू, पंचांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रसाद वारद, पार्थ कुलकर्णी , श्रद्धा कंकाळ, श्रद्धा कुलकर्णी, धनश्री मदने, श्रेया मदने, प्रेरणा सोरडे, अनुश्री कुलकर्णी, जान्हवी मदने, एकता परमा, अदिती मेनकर यांनी काम पाहिले तर स्पर्धा यशस्वीतेसाठी सोहम मेनकर, गितांजली नागरगोजे, श्वेता नागरगोजे,  विश्वजित जाधव, प्रतिक बोरुळे, ओमकार बोरुळे व अभयकुमार म्हेञे  यांनी परिश्रम घेतले. 


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर चे सचिव श्री नेताजी जाधव यांनी व्यक्त केले तर सुञसंचलन प्रसाद वारद यांनी तर आभार तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील यांनी मांडले.

Post a Comment

0 Comments