माणूस म्हणून स्त्रीला सन्मान मिळाला पाहिजे- चंद्रकला भार्गव
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी लातूर येथील आदर्श गृह उद्योग संस्थेच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या प्रा. चंद्रकला भार्गव उपस्थित होत्या. त्यांनी या प्रसंगी स्त्री नाही दासी, स्त्री नाही देवी, स्त्री नाही उपभोग्य वस्तू तर ती एक आहे माणूस. तिला माणूस म्हणून समाजात मान्यता मिळाली पाहिजे असे मत प्रतिपादन केले. त्याचबरोबर महिलांचे सक्षमीकरण या विषयाच्या अनुषंगाने बोलताना महिलांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.पौष्टिक आहार केला पाहिजे.नैसर्गिक पद्धतीने उत्पन्न झालेले अन्न खाल्ले तरच प्रतिकार शक्ती वाढू शकते. घरात मुलींवर संस्कार करत असताना मुलगा मुलगी असा भेद न करता त्यांना वाढवले पाहिजे तरच लहान मुलामुलींपासून सामाजिक स्तरावर समतेची भावना निर्माण होईल. मुली पुरुषांप्रमाणेच सक्षम आहेत हे विज्ञाने सिद्ध केले आहे तेंव्हा मुलींच्या शरीराकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहणे चुकीचे आहे. आजच्या स्थितीत मुले आणि मुली अशा दोघानाही याबद्दलचे प्रशिक्षण देण्याची काळाची गरज बनली आहे. समाजाने मुलीचा जन्म सन्मानाने व प्रसन्नतेने स्वीकारला पाहिजे. त्यातूनच निकोप अशी समाजव्यवस्था निर्माण होईल. असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सी. जे. कदम हे उपस्थित होते. त्यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन करत असताना प्रा. चंद्रकला भार्गव यांच्या कार्याची प्रेरणा विद्यार्थीनीनी घ्यावी असे मत यानिमित्ताने व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉ. नरेश पिनमकर यांनी जागतिक महिला दिनाची पार्श्वभूमी सांगून आयोजित विशेष व्याख्यानाची रूपरेषा सांगितली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे संचलन बि.एस्सी. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी रचना हजारे व माशाळकर ऋतुजा यांनी तर आभारप्रदर्शन प्राजक्ता पांचाळ हीने केले. याप्रसंगी मंचावर महिला सबलीकरण कक्षाच्या समन्वयक प्रा.मीनाक्षी बोंडगे, मराठी विभाग प्रमुख डॉ. भास्कर गायकवाड, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुरेश कुलकर्णी उपस्थित होते तर सभागृहात आजादी का अमृत महोत्सव समितीचे समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, डॉ. भगवान वाघमारे, डॉ. शशिकांत देवनाळकर, डॉ. विठ्ठल सांडूर, प्रा. शिवरुद्र बदनाळे, प्रा. गोविंद शिवशेट्टे, डॉ. विजय कुलकर्णी, प्रा. घोगरे, प्रा. वारद, प्रा. मंगरूळकर, प्रा.सोनम पाटील, प्रा. सचिन बसुदे, प्रा. सगरे, ज्ञानेश्वर खांडेकर व महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
0 Comments