Latest News

6/recent/ticker-posts

भादा ग्राम पंचायत कडून जागतिक महिला दिनी "आशा" चा सन्मान

भादा ग्राम पंचायत कडून जागतिक महिला दिनी "आशा" चा सन्मान


बी डी उबाळे

औसा: जागतिक महिला दिनी महिलांचा सत्कार कोरोना  काळामध्ये उल्लेख हे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्वान महिलाचा सत्कार ग्रामपंचायत कडून करण्यात आला. यावेळी प्रथम राजमाता जिजाई,आद्य शिक्षिका सावित्रीमाई आणि माता रमाई यांचे पूजन अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या हस्ते करून उपस्थित महिलांनी मानवंदना देण्यात आली. आणि नंतर भादा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका कल्पना दुरुगकर आणि आशा कार्यकर्ते महादेवी वाडकर,रेखा ढवळे,उषा कुंजिर,जयश्री बुरबुरे, सुवर्णमाला राऊत,रुक्मिणी गरड यांचा सत्कार सरपंच मिनाबाई दरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी भादा येथील अंगणवाडी सेविका,मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सत्काराला उत्तर देताना कल्पना दुरुगकर म्हणाल्या की, मी कधी पुण्य केले असेल त्यामुळे मला भादा गाव मिळाले आणि  माझ्या सेवानिवृत्तीच्या अगोदर मला या गावाची सेवा करण्याची संधी मिळाली आणि गावाने आम्हा कर्मचाऱ्याला शक्यतो सर्व बाबतीमध्ये मदत,सहकार्य केले याबद्दल सरपंच,उपसरपंच,ग्रा पं सदस्य ,सामाजिक कार्यकर्ते यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त केले. यावेळी ग्राम विकास अधिकारी एम व्ही सूर्यवंशी,उपसरपंच बी एम शिंदे,ग्रा प सदस्य अमोल पाटील,योगेश लटुरे,बी डी उबाळे,हणमंत दरेकर,महेश पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments