भादा अंगणवाडी पर्यवेक्षिका सुचिता कटके यांचा राज्यस्तरावर सन्मान;हैप्पी होम अंतर्गत केली उत्कृष्ट कामगिरी
बी डी उबाळे
औसा: हॅपी होम अंगणवाडी उपकृमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी बाबत लातूर जिल्ह्याचा राज्यस्तरावर सन्मान जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अजित पवार, उपमुख्यमंत्री,बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री, श्रीमती यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री यांचे हस्ते हॅपी होम अंगणवाडी उपकृमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी बाबत लातूर जिल्ह्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला. लातूर जिल्ह्याच्या वतीने राहूल केंद्रे, अध्यक्ष जि प, अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्योती राठोड, सभापती, महिला व बालकल्याण, देवदत्त गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण व सूचिता कटके पर्यवेक्षिका यांनी सदर पुरस्कार स्वीकारला. हे सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, सर्व अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी, सर्व विस्तार अधिकारी(सां) सर्व पर्यवेक्षिका, सर्व अंगणवाडी सेविका, सर्व मदतनीस, या सर्वंच्या एकत्रीत मेहनतीचे फळ आहे. असे सत्कार प्रसंगी पर्यवेक्षिका सुचिता कटके यांनी सर्व टीमचे काम आहे. याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.
0 Comments