राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्योग व व्यापार विभागाची पुण्यात बैठक
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाच्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक आज सोमवार, दि.7 मार्च रोजी दुपारी 3:00 वाजता पुणे येथील "राष्ट्रवादी भवन" येथे आयोजित करण्यात आली आहे. उद्योग व व्यापार विभागाची राज्यस्तरीय ही पहिलीच बैठक होत आहे. या बैठकीत उद्योग व व्यापार विभागाच्या पुढील वाटचालीबद्धल विचार विनिमय करण्यात येणार आहे. तसेच इतर महत्वपूर्ण विषयावर चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाच्या राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहायचे अनिवार्य आहे. असे आवाहन राष्ट्रवादीच्या उद्योग व व्यापार विभाग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे आणि प्रदेश उपाध्यक्ष केतन सदाफुले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
0 Comments