Latest News

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय आदिमुराई मार्शल आर्ट स्पर्धेसाठी लातूरच्या दोन खेळाडूंची निवड

राष्ट्रीय आदिमुराई मार्शल आर्ट स्पर्धेसाठी लातूरच्या दोन खेळाडूंची  निवड


राजकुमार भंडारी

पुणे: लातूर जिल्ह्यातील नळेगाव येथील विशाल खंडू जोगदंड व देवणी तालुक्यातील बोरोळ येथील विश्वजीत तानाजी येणकुरे यांची चौथ्या राष्ट्रीय आदिमुराई इंडियन मार्शल आर्ट स्पर्धेसाठी करपगाम विश्वविद्यालय, कोयंबतूर, तमिलनाडु येथे 28 ते 31 मार्च 2022 कालावधीमध्ये राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेकरिता महाराष्ट्र टीम मध्ये त्यांची निवड झाली असून हे दोन्ही खेळाडू प्रशिक्षक संतोष तेलंगे, विक्रम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले असून पुढे मुख्य प्रशिक्षक के.वाय.पटवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल प्रा.डॉ.फारूक तांबोळी, ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनचे कार्याध्यक्ष पी.वाय.आतार, माजी पंचायत समिती सदस्य नळेगावचे अनिल चव्हाण, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण पेठकर, युवराज देवणे, वेनेटास हेल्थकेअरचे व्यवस्थापक श्रीधर शिंदे, क्रिस्टल सिक्युरिटीचे अमित मोरे, विक्रांत मंडल, माजी ग्रा.पं.सदस्य बोरोळचे प्रा.प्रितम कोंगे, विनोद वडणे, बालाजी जोगदंड, दगडू सावळकर आदिने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments