राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांना निस्वार्थ सेवेची प्रेरणा देते- जतीन रहमान
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे वार्षिक विशेष शिबीर मौजे लांबोटा येथे संपन्न झाले. या शिबिराच्या समारोप समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निलंगा येथील उपविभागीय कार्यालयातील उपविभागीय अधिकारी जतीन रहमान हे उपस्थित होते. त्यांनी समारोप समारंभात शिबिरार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे विद्यार्थ्यांना निस्वार्थ सेवा देण्याची भावना निर्माण करते असे मत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांना पदवीच्या अंतिम वर्षात काही अतिरिक्त गुण मिळत असले तरी शिबिराच्या माध्यमातून निस्वार्थ सेवेची भावना, स्वावलंबन इत्यादी गुण आत्मसात करून उद्याच्या भारतासाठी सक्षम नागरिक निर्माण करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करत असते. असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. या समारोप समारंभास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके हे उपस्थित होते त्यांनीही याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शिबिराचे महत्व प्रतिपादन केले. या कार्यक्रमास उपस्थित असलेले लातूर येथील दयानंद महाविद्यालयातील संदीप जगदळे न्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम, प्रा. विश्वनाथ जाधव, लांबोटा येथील प्रतिष्ठित उद्योजक लालासाहेब देशमुख, भागवत सारगे, दत्तात्रय गडिमे, दत्तात्रय वाडेकर, ग्रामसेवक पाटील बि.के., वसंत मोरे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बिरादार पी.जि. यांची उपस्थिती होती. या समारोप समारंभाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विठ्ठल सांडूर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सुभाष बेंजलवार यांनी केले. तर सूत्रसंचालन शिबिरार्थी विद्यार्थिनी कु. रचना हजारे हिने केले. वार्षिक विशेष शिबिरादरम्यान शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी 'पर्यावरण व नैसर्गिक संवर्धन आणि स्वच्छ भारत अभियान' या विषयास अनुसरून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची कामे विशेषता शासकीय दवाखाना, पशु वैद्यकीय दवाखाना, मंदिर परिसर इत्त्यादी ठिकाणी स्वच्छतेचे कामे केली. जिल्हा परिषद शाळा व महारष्ट्र विद्यालय परिसरात लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचे काम, लांबोटा परिसरातील वन विभागाच्या हद्दीत वृक्ष संगोपन, व जागतिक जालदिनाचे औचित्य साधून दोन दगडी बंधारे निर्माण करण्याचे काम शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी केले. याशिवाय गावातील शेतक-यांसाठी पशु तपासणी, रोनिदन, औषधोपचार व लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात चारशेच्या वर पशूंची तपासणी करण्यात आली. या विशेष शिबिराच्या यशस्वितेसाठी कार्यक्रम अधिकारी, डॉ. सुभाष बेंजलवार, डॉ. विठ्ठल सांडूर, श्री दत्ता गडीमे, डॉ. विजय कुलकर्णी, उमाजी तोरकड, प्रकाश सुरवसे शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

0 Comments