रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत वर्तमानपत्र विक्रेते व पत्रकारांना होणार हेल्मेटचे वितरण; माझं लातूर परिवाराचा सामाजिक उपक्रम
लातूर: माझं लातूर परिवाराच्या "माझं लातूर-माझी जबाबदारी" या सामाजिक उपक्रमांतर्गत रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून लातूरच्या प्रादेशिक परिवहन विभाग आणि राधिका ट्रॅव्हल्सच्या वतीने वर्तमानपत्रांचे दुचाकीवरून वितरण करणाऱ्या 40 गरजू मुले, वार्तांकणासाठी दुचाकीवर प्रवास करणारे 50 गरजू पत्रकारांना हेल्मेटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यासह संपूर्ण देशातील घटनांचा वेध घेणारे तसेच लातूरकरांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या माझं लातूर परिवाराच्या पुढाकाराने लातूरच्या यशवंतराव कॉम्प्लेक्स, अशोक हॉटेल येथे येत्या 29 मार्च 2022 रोजी सायंकाळी 6:00 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, उद्घाटक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अरुण समुद्रे, अभय मिरजकर यांच्यासह शहर वाहतूक पोलीस शाखेचे अधिकारी, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, नायब तहसीलदार यांची उपस्थिती राहणार आहे. याच कार्यक्रमात खाजगी प्रवासी वाहतूक क्षेत्रातील अनुभवी आणि जबाबदार 10 वाहन चालकांचा त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र आणि हेल्मेट देऊन सन्मान करण्यात येणार आहे. हेल्मेटसाठी पत्रकारांनी 9422071363, 9422071717, 8623093100, 9923001824, 9422612245, 9673159490, 9270831750 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधून नोंद करावी पात्र 50 पत्रकारांना हेल्मेटचे वितरण होईल. यासाठी जास्तीतजास्त गरजू पत्रकारांनी नोंदणी करावी असे आवाहन माझं लातूर परिवार आणि राधिका ट्रॅव्हल्सच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments