शिवसेना अल्पसंख्याक निलंगा तालुका प्रमुख पदी लायक ताजुद्दीन शेख यांची निवड
निटूर: येथील शिवसेनेचे कार्यकर्ते व लिंबन महाराज रेशमे यांचे विश्वासू लायक ताजुद्दीन शेख यांची शिवसेना अल्पसंख्यांक निलंगा तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली असून सदर निवड शिव सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून शिवाजी माधवराव माने शिवसेना जिल्हा प्रमुख,लातूर यांनी लायक शेख यांची निवड केली आहे. सदर नियुक्ती पत्रात आपण प्रमाणिक, कष्टाळू तसेच राष्ट्रउपयोगी कार्याने शिव सैनिकांवरील विश्वाससार्थ ठेउन कार्य करावे असे नमूद केले आहे. या निवडीबद्दल राजाभाऊ सोनी, नेहालपाशा मुल्ला, सुशांत घाडगे, शिवाजी सोमवंशी, प्रसाद बुरकुले, बाबुराव बुरकुले, शिवाजी बुरकुले, बालाजी बुडगे, वामन मानकोस्कर, वसंत सावळे, शब्बीर शेख, खंडू बुरकुले, अशोक कवडे, गोपाळ नाईक, विजय जाधव, लालासाहेब देशमुख सह मित्रपरिवारातून अभिनंदन होत आहे.
0 Comments