Latest News

6/recent/ticker-posts

अजीम हायस्कुल मध्ये स्वयंशासन दिन साजरा

अजीम हायस्कुल मध्ये स्वयंशासन दिन साजरा


शेख बी. जी.

औसा: दि.१२ अजीम हायस्कुल औसा येथे स्वयंशासन दिन व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कोवीड-१९ च्या मुळे सलग दोन वर्ष कोणत्याही शाळेला स्वयंशासन दिन व १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम झाला नाही परंतु २०२२ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेच्या अगोदर विद्यार्थ्यांना निरोप देने व स्वयंशासन दिन साजरा करने हे दोन्ही कार्यक्रम अतिशय उत्साहाने पार पडले. स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक म्हणुन शेख सुलेमान अफसर मुख्याध्यापिका कु.सय्यद अर्शिया हकीम पर्यवेक्षिका कु.पुजा सुर्यवंशी व वाघमारे यांनी काम पाहीले या कार्यक्रमाला हायस्कुल चे मुख्याध्यापक निजामोद्दीन शेख साहेब व हायस्कुल चे पर्यवेक्षक केसरे सर यांची उपस्थिति लाभली. आपल्या मार्गदर्शन पर भाषणात मुख्याध्यापक निजामोद्दिन शेख सरांनी आयुष्यात " संस्कार ची पाठशाला" कशी महत्वाची आहे ,शिक्षण घेणार्यासाठी " हिन्दुस्तानी एज्युकेशन सोसायटी " चे दारे नेहमी खुले ठेवण्याचे आश्वासन मुलांना दिले व येणार्या दहावीच्या परीक्षेसाठी सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काझी के.टी , सय्यद हकीम, पाटिल सुनिल,शेख एन.एन, शेख ए.के,गुलफरोश जे.के, काझी असमत , भिसे , काळे , गवारे ,जगताप ,तत्तापुर, लष्करे ,कोळपे,अभय लांडे,निटुरे आदि शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मेटे एस. व्ही. तर आभार प्रदर्शन पठाण समीर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments