Latest News

6/recent/ticker-posts

अनुभव शिक्षा केंद्र लातूर जिल्ह्यातील देवणी व उदगीर तालुक्यात कमिटीची स्थापना

अनुभव शिक्षा केंद्र लातूर जिल्ह्यातील देवणी व उदगीर तालुक्यात कमिटीची स्थापना


देवणी:( प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) अनुभव शिक्षा केंद्र, लातूर आयोजित एकदिवसीय कार्यशाळा  पर्यटनस्थळ  हत्ती बेट या ठिकाणी नेत्रत्व विकास या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी देवणी तालुक्यातील बटनपूर,तळेगांव(भो),धनेगाव, चवनहीप्परगा, देवणी, सिद्धीकामठ, बोळेगाव, आनंदवाडी,गुरणाळ,उदगीर, वलाडी,या गावांतील अनेक युवक उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्य मार्गदर्शक अनुभव शिक्षा केंद्राचे महाराष्ट्र राज्य समन्वयक सचिन नाचनेकर व पश्चिम व उत्तर महाराष्ट्र चे समन्वयक स्वप्निल मानव यांची प्रमुख उपस्थिती होती. या सत्राचे संयोजन जिल्हा समन्वयक महादेव कोटे यांनी केले. व मार्गदर्शन करताना सचिन सर यांनी युवकांना नेतृत्व करत असताना वेगवेगळया कौशल्यांवर संवाद साधला, त्याचबरोबर सरकारी यंत्रणांमध्ये युवकांचा सहभाग कसा वाढवू शकतो व त्यातून गावचा विकास करण्यासाठी गावातीलच युवकांच्या सहभागातून सकारात्मक बदल घडवू शकतो यावर सहभागी युवकांसोबत संवाद साधला. पश्चिम व उत्तर महाराष्ट्र चे समन्वयक स्वप्निल मानव यांनी अनुभव शिक्षा केंद्र या प्रक्रियेबद्दल युवकांसोबत संवाद साधून ही या प्रक्रियेची रचना व उद्देश यावर युवकांसोबत संवाद साधला. यावेळी अनुभव शिक्षा केंद्राची देवणी तालुक्याची कमिटी (तालुका कमिटी) स्थापन करण्यात आली. देवणी तालुका कमिटी दत्ता बिरादार यांची कार्यवाहक म्हणून तर विक्रम गायकवाड यांची तालुका संघटक म्हणून सर्वानुमते नेमणूक करण्यात आली, तालुका समिती सदस्य व गाव संघटक म्हणून अमर सुर्यवंशी (बटनपूर), हुशेन तुरे (धनेगाव), वैभव मेहेत्रे (बोळेगाव), नवनाथ सूर्यवंशी (गुरनाळ), अमर पुंजारे (सिंधीकामात), महेश काळे (कोनाळी), दत्ता बिरादार (तळेगाव), सिद्धेश्वर मीरजे (आनंदवाडी), तुकाराम गुंडरे (चवनहीप्पर्गा)देवणी तालुका याची नेमणूक करण्यात आली.या वेळी देवणी तालुक्यातील ईश्वर पाटील, विकास बिरादार, मनोज करेप्पा,ज्ञानराज नादरगे, सिद्धेश्वर मिरचे,राम चिंचोळे, बालाजी बर्गे,शिवकुमार स्वामी,सागर शिंदे, बाळू बिरादार, राजकुमार गायकवाड आदी, युवक उपस्थित होते.व तसेच तालुक्यातील अनेक गावांत भेटी देवून अनुभव कट्टे स्थापन करण्यात आले. त्यात नागतीर्थ वाडीचे सरपंच राज गुणाले,वागदरी चे सरपंच ज्ञानेश्वर होळसमरे, सिद्धीकामठ चे अनुरुत मेळकुठे ,बटनपूर चे प्रथम नागरिक यांचे पती तुकाराम कांबळे यांना भेट देण्यात आली व अनेक सामाजिक परिस्थिती ची चर्चा करण्यात आली त्यामध्ये युवकांसाठी रोजगार निर्मिती व शैक्षणिक संदर्भात युकासोबत हितगुज करण्यात आले. या कार्यक्रमाच आभार महादेव कोटे यांनी केला.

Post a Comment

0 Comments