Latest News

6/recent/ticker-posts

लातूरच्या सहा कराटेपटूना पुण्यात ब्लॅक बेल्ट 1 डॅन पदवी बहाल

लातूरच्या सहा कराटेपटूना पुण्यात ब्लॅक बेल्ट 1 डॅन पदवी बहाल


लातूर: येथील अशीहारा कराटे असोसिएशन, लातूरच्या सहा कराटेपटूना ब्लॅक बेल्ट 1 डॅन पदवी पुणे येथे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखाचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, स्पोर्ट्स केम्पो इंडियन फेडरेशनचे अध्यक्ष सी.ए. तांबोळी, आयोजक गोरखनाथ मोरे,ज्येष्ठ पत्रकार विनोद शिरसाट, अविनाश चिलेकर आदी प्रमुख्य मान्यवरांच्या उपस्थितीत बहाल करण्यात आले. ओंकार लॉन्स, देहू- आळंदी रोड, टाळगाव चिखली, पुणे येथे समारंभपूर्वक ब्लॅक बेल्ट 1 डॅन ही पदवी लातुरच्या तीन कराटेपटूना प्रधान करण्यात आली यामध्ये विशाल जोगदंड, विश्वजीत येनकुरे, शिवलिंग मुचुटे सह अर्चना राठोड, जिजाबाई कवडे, त्र्यंबक कांबळे यांनीही यश संपादन केले आहे. 

लातूरचे कराटे प्रशिक्षक के.वाय.पटवेकर मार्शल आर्ट क्रीडाक्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला या यशस्वी कराटेपटूना मुख्य प्रशिक्षक के.वाय.पटवेकर, खय्युम तांबोळी, संतोष तेलंगे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी कराटे खेळाडूंचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.



Post a Comment

0 Comments