मनरेगा अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढ व विविध प्रलंबित मागण्यासाठी काम बंद आंदोलनाचा इशारा
बी डी उबाळे
औसा: औसा तालुक्यातील मनरेगा कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याकरिता औशाचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत. मनरेगा कंत्राटी कर्मचारी यांना समान काम समान वेतन लागू करण्यात यावा. किंवा पश्चिम बंगाल प्रमाणे वाढ देण्यात यावी अथवा जिल्हा MIS समनव्यक-60 हजार कार्यक्रम व्यवस्थापक (PM)-55 हजार, सहायक कार्यक्रम अधिकारी (APO) 50 हजार, तांत्रिक सहाय्यक(TA) 50 हजार-व लिपिक कम डेटा एन्ट्री ऑपरेटर (CDEO)-40हजार- मानधन वाढ व प्रवास भत्ता (T.A.) देण्यात यावा व महाराष्ट्रात अनुभवानुसार मानधन वाढ न करता पदानुसार मनरेगा कर्मचा-यांना सारखे मानधन देण्यात यावे, दिनांक 1 सप्टेंबर 2019 नुसार झालेल्या मानधण वाढ अनुभव नुसार मिळाली नसुन ती आजतागायत वाढ व होत असलेल्या तफावतीची रक्कम अदा करण्यात यावी,CSC रद्द करावी, कर्मचारी यांच्या मागणी नुसार बदल करण्यात यावे व ऑनलाईन हजेरी ॲप रद्द करावे, तांत्रिक सहाय्यक पदाला दिलेली मोजणी पुस्तकातील नोंदी प्रमाणित करणे बाबत 20 जाने 2014 चे शासन परिपत्रक 10हजार रुपये ची मर्यादा आजच्या अनुभवा नुसार 1.50 लक्ष करून देण्यात यावी,दरवर्षी मानधन मध्ये किमान 8% वाढ देण्यात येऊन याबाबत शासन निर्णय निर्गमित करावे,ग्राम रोजगार सेवक यांचे मानधन आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्या प्रमाणे दरमहा 10 हजार फिक्स करण्यात यावे,वयाव्यतिरिक त्यांना प्रवासभत्ता देण्यात यावा, व तसेच दरमहा मानधन ग्रामरोजगार सेवक खातेवर अदा करण्यात येऊन ग्रमरोजगार सेवक नियुक्ती पूर्ण वेळ व प्रशासकीय करण्यात यावी,सर्व कर्मचारी यांना PF लागू करण्यात यावा, अपघाती मृत्यू 50 लक्ष, मेडिक्लेम 10 लक्ष देण्यात यावे व वार्षिक किमान 24 C.L. शासकीय नियमानुसार मेडिकल सुट्टी देण्यात यावी, कार्यरत कर्मचारी यांना क्षुल्लक कारणास्तव कामावरून कमी न करता आर्थिक किंवा गुन्हा दाखल झाल्यास त्यांची चौकशी करून त्या नंतरच कामावरून कमी करण्यात यावे. तसेच मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांना योजना असेपर्यंत वयाच्या 60 वर्षापर्यंत संरक्षण देण्यात यावे, मनरेगा कायद्यांतर्गत योजनेत काम करणारी प्रत्येक कर्मचारी यांचे पदनिहाय जॉबचार्ट व जबाबदारी देण्यात यावी. उपरोक्त मागणी ही रास्त असून त्या संदर्भात लेखी स्वरूपात केलेली कार्यवाहीची माहिती देण्यात यावी. अन्यथा नाईजालास्तव आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी याना संपूर्ण महाराष्ट्रात टप्प्या टप्प्याने आंदोलन करणे भाग पडेल असे निवेदनातं कळवीले आहे.
0 Comments