नवी मुंबई वाशी येथे जागतिक महिला दिनानिमित्त स्वसंरक्षण शिबिरात चित्तथरारक प्रात्यक्षिके !
के वाय पटवेकर
नवी मुंबई: रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, बॅ. पी. जी पाटील सभागृह वाशी येथे(स्वायत्त महाविद्यालय) महिला सक्षमीकरण समिती आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त स्वसंरक्षण एक दिवशी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कराटे प्रशिक्षक मनोज बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी आणि व प्रशिक्षित महिला कराटेपटूने चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. शुभांगी पारकर(मानसोपचारतज्ञ), अध्यक्ष- डॉ. शुभदा नायक, सुजाता बोटे, प्रमुख महिला सक्षमीकरण समितीच्या डॉ. शुभदा नायक, प्र.प्राचार्या क.भा.पा.कॉलेज वाशी या मंचावर उपस्थित होत्या. गायत्री भागवत,अमृता सुगादर, सोनाली सावंत, निलिमा वाघमारे, महिमा गुप्ता, सम्पत्ति यादव, वैष्णवी खरात, साक्षी गाडे, अंजली पाटील, संगिनी जाधव, अनघा ताडय, सिद्धी वनवे, कन्या शिर्के, आश्विका दानोरकर, साक्षी धनावडे, सिद्धी दभाडे, साक्षी गोरे, निकिता धनावडे, नंदिनी भेंडेकर, प्रणिता जाधव आदी प्रशिक्षणार्थी सह मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
0 Comments