Latest News

6/recent/ticker-posts

जुगलकिशोर तोष्णीवाल प्राईड ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित

जुगलकिशोर तोष्णीवाल प्राईड ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित


लातूर: मध्यप्रदेशातील इंदोर येथील मां भुवनेश्वरी ज्योतिष वास्तु कर्मकांड शोध संस्थानच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ज्योतिष महासम्मेलनात ज्योतिष क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लातूरचे व्यावसायिक, ज्योतिष तंत्रसाधक जुगलकिशोर तोष्णीवाल यांना प्राईड ऑफ इंडिया या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते माझं लातूर परिवाराचे क्रियाशील सदस्य आहेत. संस्थानच्या वतीने 26 आणि 27 मार्च रोजी इंदोर शहरात दोन दिवसीय ज्योतिष महासंमेलन पार पडले या संमेलनात देशभरातील 51 तंत्रसाधकांचा ज्योतिषशास्त्रातील योगदानाबद्दल प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी संस्थानचे संस्थापक अध्यक्ष आचार्य डॉ. संतोष भार्गव यांच्यासह देशभरातील ज्योतिष विद्वान मोठया संख्येने उपस्थित होते. ज्योतिष क्षेत्रातील हा प्रथितयश पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जुगलकिशोर तोष्णीवाल यांचे माझं लातूर परिवारासह त्यांच्या मित्र आणि आप्तेष्टांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments