सात वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस नेरूळ पोलिसांनी केली अटक
नेरुळ: वाशी न्यायालयात ड्रग्ज संदर्भातील एनडीपीएस यामध्ये न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट आरोपी-नामे विनोद व्हिक्टर लाजरस, वय 47 वर्ष, रा. सेक्टर 29 अग्रोळी गाव सीबीडी याचे वर जारी केले होते. सदर आरोपी हा गेल्या 7 वर्षापासून फरार होता. त्या अनुषंगाने नेरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस पोलिस निरीक्षक शाम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय कांगणे व पोलीस कॉनस्टेबल रशीद युसुफ पटवेकर यांच्या पथकाने शिताफतीने नमूद आरोपीस अटक करून मा. न्यायालयात हजर केले. यापूर्वी सुद्धा नमूद पोलीस पथकाने एका केस मध्ये 20 वर्षापासून फरार असणाऱ्या आरोपीस अटक केली होती. नमूद केलेल्या कामगिरी बद्दल नेरूळ पोलिसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


0 Comments