Latest News

6/recent/ticker-posts

कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी नवी मुंबईच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी नवी मुंबईच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड


के वाय पटवेकर

नवी मुंबई: रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी नवी मुंबईच्या विद्यार्थ्यांची चौथ्या राष्ट्रीय आदिमुराई इंडियन मार्शल आर्ट स्पर्धेसाठी करपगाम विश्वविद्यालय, कोयंबतूर, तमिलनाडु येथे 28 ते 31 मार्च 2022 कालावधीमध्ये राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेकरिता महाराष्ट्र टीम मध्ये सोनाली सावंत, सिद्धेश सावंत, भावेश करे, अमृता सुगदरे, किरण सुगदरे यांची निवड झाली असून महिला प्रशिक्षक दीप्ती पवार, रजनी गुप्ता, यांचे मार्गदर्शन लाभले. पुढे मुख्य प्रशिक्षक मनोज लिलधर बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल प्राचार्या डॉ. शुभदा नायक, महिला सक्षमीकरण समितीच्या प्रमुख सुजाता बोटे, राष्ट्रीय छात्र सेनेच्या संयोजिका गायत्री गायधने, प्रा. डॉ. फारुक तांबोळी, नवी मुंबई राष्ट्रवादी युवा कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष किशोर अन्नू आंग्रे, स्वास्थ्य समिति नवी मुंबईचे अध्यक्ष विक्रम शिंदे, वाशी नवी मुंबई गुजराती समाजाचे हसमुखभाई पटेल, कोसिकभाई पटेल, माथाडी कामगार नवी मुंबईचे सचिव प्रकाश बागल, योमन समुद्री सेवा नेरूळ नवी मुंबईचे योगेश त्रिवेदी, विलास उदवंत, विजय पांडे, समाजसेवक आप्पा चिकणे आदिने निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



Post a Comment

0 Comments