वसुंधरेला नटवून नवं शिशुला दिला गृह प्रवेश भादा ग्रामपंचायत सदस्य तथा शिशु पिता अमोल पाटील यांचा सामाजीक संदेश लयभारी
बी डी उबाळे
औसा: नवं बालकाचे प्रथमच भाद्यामध्ये आगमन झाले असता पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या द्रष्टिने एक पाऊल पर्यावरणाकडे म्हणून नवं शिशुला गावात व घरात प्रवेश देण्याअगोदर त्याच्याच हस्ते कांही वृक्षांचे वृक्षारोपण स्वतःच्या भादा-औसा रस्त्यावरील शेतीमध्ये करून नंतरच गावात व घरात प्रवेश देऊन भव्य स्वागताची तयारी करीत अमोल पाटील यांनी गृहप्रवेश देऊन नवं शिशुचे स्वागत केले. या अनोख्या आणि स्वागताचा नवाच मानवी जीवनासाठी आवश्यक असा आश्चर्यकारक अनेकांसाठी चमत्कारिक सामाजीक उपक्रमाचे सोशल मीडियावर अनेकांनी तोंड भरून कौतुक केले आहे.आणि "झाडे लावा, झाडे जगवा" हा नैसर्गिक समतोल राखणारा सामाजिक उपक्रम लय भारी राबविण्यात आला आहे. अशी सध्या सर्वत्र चर्चा केली जात आहे.
0 Comments