Latest News

6/recent/ticker-posts

कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी नवी मुंबईची दमदार कमाई; राष्ट्रीय स्पर्धेत पाच सुवर्णपदक, दोन रजत पदक, चार कास्यपदक

कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी नवी मुंबईची दमदार कमाई; राष्ट्रीय स्पर्धेत पाच सुवर्णपदक, दोन रजत पदक, चार कास्यपदक





के वाय पटवेकर

नवी मुंबई: रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी नवी मुंबईच्या विद्यार्थ्यांची चौथ्या राष्ट्रीय आदिमुराई इंडियन मार्शल आर्ट स्पर्धेसाठी करपगाम विश्वविद्यालय, कोयंबतूर, तमिलनाडु येथे 28 ते 31 मार्च 2022 कालावधीमध्ये राष्ट्रीय स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये पाच सुवर्णपदक, दोन रजत पदक, चार कांस्य पदकाची कमाई करत महाराष्ट्राला झुकते माप देत राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र तिसरा क्रमांक देत नवी मुंबईने शान राखली 


या स्पर्धेकरिता महाराष्ट्र टीम मध्ये सोनाली सावंत, सिद्धेश सावंत, भावेश करे, अमृता सुगदरे, किरण सुगदरे यांची आपली चमक दाखवत सदरील महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. यशस्वी खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. शुभदा नायक, उप प्रा.सी.डी.भोसले, महिला सक्षमीकरण समितीच्या प्रमुख सुजाता बोटे, राष्ट्रीय छात्र सेनेच्या संयोजिका गायत्री गायधने, डॉ.राजश्री घोरपडे, सारंग भागवत डॉ. मनीषा अभयंकर आदिने निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले. यशस्वी खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक मनोज लीलाधर बरडे यांचे मार्गदर्शन लाभले.








Post a Comment

0 Comments