शिरोळ जि.प. शाळा येथे स्वयंशासन दिन,किशोरवयीन मुलींचे उद्बबोधन व निरोप समारंभ
शिरोळ:(प्रतिनिधी सलीम पठाण) दि.1/4/2022 रोजी जि.प.कें. प्रा.शाळा शिरोळ येथे इयत्ता ७ वी चा स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला.
स्वयंशासन दिनाचे औचित्य साधून इयत्ता ६ वी व ७ वीच्या किशोरवयीन मुलींना डॉ. प्रतिभा येळकर मॅडम( उपकेंद्र,शिरोळ ) यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. किशोरवयीन मुलींच्या समस्या त्यांचं निराकरण याविषयी सखोल मार्गदर्शन प्रतिभा मॅडम यांनी केले शेवटी इयत्ता-७ वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन पाटील होते प्रमुख पाहुणे, जाधव ज्ञानेश्वर (मु.अ. वळसांगवी) पाटील, गिरकचाळ हे उपस्थित होते. स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक प्रतीक जाधव तर श्रध्दा जाधव उपमुख्याध्यापिका,पर्यवेक्षक शिवम जाधव यांनी पदभार भूषवले.विद्यार्थ्यानी पुढील शिक्षणासाठी जि.प. शाळा सोडुन पुढच्या शिक्षणासाठी जाताना या शाळेच्या आठवणींची शिदोरी कशी उपयोगी पडेल हे भावुक करणारे आपले मनोगत सादर केली शिक्षक आणी विद्यार्थी यांच्यातील जिव्हाळ्याचं नातं हे स्तब्ध करणारं होतं. उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं. कार्यक्रम संपन्न करण्यासाठी शिरोळ शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले . शेवटी रुचकर भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

0 Comments