Latest News

6/recent/ticker-posts

भादा येथे सिंचन विहीर लाभधारकाना विहीर खोदकामासाठी रेखांकन करून दिली परवानगी

भादा येथे सिंचन विहीर लाभधारकाना विहीर खोदकामासाठी रेखांकन करून दिली परवानगी



बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथे वैयक्‍तीक सिंचन विहीर खोदकाम करण्यासाठी रेखांकन करून मान्यता देण्यात आली. यावेळी भांदा येथील शेतकरी आणि या नरेगा योजनेवर काम करणारे अधिकारी कर्मचारी यामध्ये ग्राम विकास अधिकारी माणिक सूर्यवंशी आणि तांत्रिक अधिकारी एस व्ही माने यांनी वैयक्तिक सिंचन विहीर लाभधारकांना जयश्री चांभारगे, मीनाक्षी लातुरे, शंकर हजारे,बळी रत्ने,हनुमंत शिरसागर यांना मार्क आउट देण्यात आले. यावेळी उपसरपंच बालाजी शिंदे,तंटामुक्त समिती अध्यक्ष सूर्यकांत पाटील,ग्रा रो से बालाजी डी उबाळे, तलाठी राम दूधभाते,सोसायटी चेअरमन दत्तकुमार शिंदे आणि सिंचन विहीर लाभधारक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments