निरागस अरसलानने साजरा केला रोजा(उपवास) राहून वाढदिवस
अरसलान वहाब जागीरदारचा पहिला रोजा पुर्ण
बी जी शेख
नळेगाव: दि. 7 - पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा(उपवास) पूर्ण करून नळेगाव शहरातील अरसलान वहाब जागीरदार ह्या जगाचा निर्माता अल्लाह ने सांगितलेल्या पाच कामांपैकी एक काम पूर्ण करून आपल्या संवेदना व्यक्त केल्या. सध्याचे तापमान आणि रखराखत्या उन्हात पहाटे पाच वाजेपासून सायंकाळी पवने सात वाजेपर्यंत अन्नाचा एक कण आणि पाण्याचा एक थेंब न घेता दिवसभर उपाशी राहून त्यांनी अल्लाहप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. विशेष बाब म्हणजे आज अरसलान जागीरदार चा वाढदिवस होता. आणी त्यांनी आपला वाढदिवस रोजा(उपवास) राहून साजरा केला. कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

0 Comments