उपसंचालक कार्यालयात कुष्ठरोगतज्ञ देपे ज्ञानेश्वर यांचा सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सन्मान
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) येथील उपजिल्हा रुग्णालयात कुष्ठरोगतज्ञ म्हणून कार्यरत असलेले देपे ज्ञानेश्वर गणपती यांनी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत मागील तीन वर्षांपासून निलंगा तालुक्यातील नवीन कुष्ठरुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट पूर्तता व कुष्ठरुग्णांना उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल आज दि.7 एप्रिल रोजी उपसंचालक, कार्यालय लातूर येते जागतिक आरोग्य दिनाचे आवचित्य साधून कुष्ठरोगतज्ञ देपे ज्ञानेश्वर गणपती यांचा उपसंचालक डॉ. एकनाथ माले, सहाय्यक संचालक, कुष्ठरोग लातूर डॉ.हेमंत बोरसे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.लक्ष्मण देशमुख यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या सन्मानाबद्दल कुष्ठरोगतज्ञ देपे ज्ञानेश्वर यांचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीप सौंन्दळे व रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

0 Comments