Latest News

6/recent/ticker-posts

तामिळनाडू येथील आदिमुराई राष्ट्रीय स्पर्धेत लातूरला एक रजत व तीन कास्य पदक

तामिळनाडू येथील आदिमुराई राष्ट्रीय स्पर्धेत लातूरला एक रजत व तीन कास्य पदक





लातूर: जिल्ह्यातील नळेगाव येथील विशाल खंडू जोगदंड व देवणी तालुक्यातील बोरोळ येथील विश्वजीत तानाजी येणकुरे या खेळाडूंची चौथ्या राष्ट्रीय आदिमुराई इंडियन मदर मार्शल आर्ट स्पर्धेसाठी करपगाम विश्वविद्यालय, कोइम्बतुर तमिलनाडु येथे 28 ते 31 मार्च कालावधीमध्ये राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली होती. या स्पर्धेमध्ये लातूरला, एक रजत पदक, तीन कास्य पदकाची कमाई करत वरिष्ठ गटात निर्णायक ठरत राष्ट्रीय स्पर्धेत आपली चमक दाखवत महाराष्ट्रला तिसरा क्रमांक मिळवून देत लातूर व नवी मुंबईच्या खेळाडूने शान राखली. यशस्वी खेळाडूंचे महाराष्ट्र आदिमुराई असोसिएशनचे प्रा.डॉ.फारूक तांबोळी, कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे, माझं लातूर परिवाराचे सतीश तांदळे, ज्येष्ठ पत्रकार अभय मिरजकर, दीपरत्न निलंगेकर, लिंबराज{अण्णा} पन्हाळकर, अरुणकुमार मेहत्रे, अमोल घायाळ, सागर तापडिया, राजकुमार सोनी लक्ष्मण पेठकर, युवराज देवणे, संतोष तेलंगे, विक्रम गायकवाड, प्रा.प्रितम कोंगे आदिने यशस्वी खेळाडूंचे व महाराष्ट्र टीमचे मुख्य प्रशिक्षक के.वाय. पटवेकर यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments