Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र: जन आंदोलनांचा दैदिप्यमान इतिहास आणि सध्याची स्वस्त आंदोलने

महाराष्ट्र: जन आंदोलनांचा दैदिप्यमान इतिहास आणि सध्याची स्वस्त आंदोलने


हाराष्ट्रातील आजवरच्या आंदोलनांचा अभ्यास केला असता त्या चळवळींना एक सोज्वळ किनार होती. सामाजिक, राजकीय, पर्यावरण, शेतकरी, धरणग्रस्त, पूरग्रस्त, भूकंपग्रस्त सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी यशस्वी आंदोलने झाली हा आपल्या लोकशाहीचा विजय आहे. या सर्व आंदोलनांमध्ये सामान्य माणूस केंद्रस्थानी होता. त्यांच्या मूलभूत अधिकार आणि हक्कासाठी संघर्ष आणि या संघर्षाचे नेतृत्व करताना या सर्व महान नेत्यांनी आंदोलने करताना जाणीवपूर्वक संविधानिक संकेत पाळले. केवळ विरोध करणे म्हणजे आंदोलन नसते हे या विभूतींनी आपल्या आचार-विचार-वर्तनातून देशाला दाखवून दिले. म.फुले, लोकमान्य टिळक, डॉ बाबासाहेब आंबेडकर, शरद जोशी, अण्णा हजारे, बाबा आमटे, मेधाताई पाटकर अशा कितीतरी नेत्यांची नावे आपणास घेता येतील. आता राज्यात होत असलेली किंवा झालेली किती आंदोलने यशस्वी किंवा परिणामकारक ठरली हा संशोधनाचा विषय ठरतो आहे. व्यक्तिकेंद्रित, स्वप्रसिद्धी, आणि वैयक्तिक लाभासाठी केली जाणारी आंदोलने आणि अशा स्वस्त पातळी सोडून केल्या गेलेल्या असामाजिक आंदोलनामुळे खऱ्या आंदोलकांचे, पीडित समूहाचे नुकसान होत आहे. कसलाही जनाधार नाही, लोकांच्या प्रश्नांची जाण नाही, आपण काय साध्य करतोय किंवा करणार आहोत याचा कसलाही अभ्यास नाही. दोन, चार कार्यकर्ते गोळा करायचे (ते कसे गोळा होतात हे सांगणे नाही), विष ओकायचे, विभद्र चाळे करायचे झाले आंदोलन यशस्वी.

अशा स्वयंघोषित नेते आणि त्यांच्या किळसवाण्या आंदोलनांचा जनतेला वीट आलेला आहे. थोडं आत्मचिंतन करून बघितलं तर कळेल आपण काय करतोय आणि कशासाठी.

(कुठले संदर्भ जोडायचे हे ज्याचे त्यांनी ठरवावे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या असामाजिक आंदोलनावर हे भाष्य केले आहे.)


सतीश तांदळे{माझं लातूर}

Post a Comment

0 Comments