किसानपुत्र पाळणार काळा दिवस;18 जून रोजी पुण्यात पदयात्रा
पुणे: 18 जून 1951 रोजी झालेल्या घटना बिघाडा मुळे शेतकऱयांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. परिशोषत-9 मुळे शेतकरी गुलाम झाला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी 18 जून रोजी शेतकरी पारतंत्र्य अर्थात काळा दिवस पाळला जातो. या वर्षी पुण्यात किसानपुत्रांची एक पदयात्रा काढली जाणार आहे, पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून निघणारी ही पदयात्रा महात्मा फुले वाड्यापर्यंत जाईल आणि तिथे समारोप करण्यात येईल. या पदयात्रेत स्वतंत्रतावादी शेतकरी नेते ललित बहाळे (अध्यक्ष शेतकरी संघटना) अनिल घनवट (माजी अध्यक्ष, शेतकरी संघटना व राष्ट्रीय अध्यक्ष स्व.भा.पा.), रघुनाथ दादा पाटील (अध्यक्ष, शेतकरी संघटना), विनय हर्डीकर (विचारवंत व भारत-इंडिया फोरमचे मार्गदर्शक) आणि अमर हबीब (किसानपुत्र आंदोलन) हे सहभागी होणार आहेत. किसानपुत्रांनी या पदयात्रेत सहभागी होऊन शेतकरी स्वातंत्र्याच्या लढाईला हातभार लावावा, असे आवाहन अमर हबीब (किसानपुत्र आंदोलन) व त्यांच्या समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments