समृध्दी जयदेव म्हमाणे हिची जागतिक बेल्ट रेसलिंग स्पर्धेकरिता निवड
पुणे:(प्रतिनिधी/राजकुमार भंडारी) दि. २५ ते २९ मे २०२२ दरम्यान कोकद, उज्बेकिस्तान येथे बेल्ट रेसलिंग वर्ल्ड चॅपियनशिपचे आयोजन करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी समृध्दी जयदेव म्हमाणे हिची भारतीय संघात ४४ किलो वजन गटात निवड झाली आहे. समृध्दीने जिल्हा, राज्य, व राष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळवली आहेत. ती आंतरराष्ट्रीय खेळाडू जयदेव घनश्याम म्हमाणे याची कन्या आहे. बेल्ट रेसलिंग खेळांचे धडे घरातूनच मिळाले आसून, ती सध्या पिंपरी चिंचवड ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशन या संस्थेत सराव करित आहे. या निवडीबद्दल ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक सी.ए.तांबोळी, "मराठी अस्मितेचा इशारा" वृत्तपत्राचे संपादक के.वाय. पटवेकर, मनोज बरडे, राजकुमार भंडारी, रेवनशिध्द आंधळकर, वडगाव(काटी) येथील शाळेतील मुख्याधापक राजकुमार म्हमाणे, मंगेश म्हमाणे, उमाजीआप्पा गायकवाड सह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

0 Comments