भित्तीपत्रकातुन विद्यार्थ्यांनी मांडली संगणकाची भाषा
निलंगा:{ विशेष प्रतिनिधी/इरफान शेख } येथील महाराष्ट्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भित्तिपत्रकाच्या माध्यमातून संगणक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या विविध भाषांची माहिती दिली. संगणकाच्या क्षेत्रात आज मिळवलेले ज्ञान दुसऱ्यादिवशी बाद ठरत आहे अशी अवस्था आहे. या नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने या भित्तिपत्रकाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभागाच्या वतीने आयोजित या भित्तिपत्रक स्पर्धेत ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ज्यातून विद्यार्थ्यांनी C,C++,Java, Pathan,V.D, PHP,C SAP, Android या सारख्या विविध भाषांचा संगणकात कसा वापर केला जातो व सॉफ्टवेअर बनविण्याकरिता कसा वापर होतो हे भित्तिपत्रकांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला.
या भित्तिपत्रकाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांनी केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.प्रशांत गायकवाड, डॉ.धनंजय जाधव यांची उपस्थिती होती. भित्तिपत्रकाच्या परीक्षणाची जबाबदारी उपप्राचार्य डॉ.चंद्रकुमार कदम यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.भास्कर गायकवाड व डॉ.अजित मुळजकर यांनी पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.रवींद्र मदरसे, प्रा.गिरीश पाटील, प्रा .मयूर शिंदे , प्रा .धनराज कीवडे, प्रा. शुभांगी शहापुरे व सिद्धेश्वर कुंभार यांनी परिश्रम घेतले.


0 Comments