Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र शासनाच्या "मध्यान्ह भोजन योजनेचा" नणंद येथे शुभारंभ

महाराष्ट्र शासनाच्या "मध्यान्ह भोजन योजनेचा" नणंद येथे शुभारंभ



निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने बांधकाम कामगार व इतर क्षेत्रातील काम करणाऱ्या मजूर वर्गास दुपारच्या वेळेचे जेवण दिले जात आहे. या "मध्यान्ह भोजन योजनेचा" शुभारंभ युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांच्या वतीने नणंद येथे करण्यात आला. बांधकाम कामगार, प्लंबर, कुंभार, सुतारकाम अशा अनेक क्षेत्रात करणाऱ्या व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांनी केले आहे. या योजनेचा शुभारंभ करताना उपस्थित दिगंबर लादे, पांडुरंग लादे, संगमेश्वर मठपती, पार्शनाथ इंडे, तुकाराम पेठकर, सतीश लादे,  उद्धव जाधव, किशोर पाटील, राजेंद्र मिरगाळे, मधुकर लादे आदीसह नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments