Latest News

6/recent/ticker-posts

सावधगिरीचा इशारा

सावधगिरीचा इशारा


दिनांक 30 मे 2022 ते 01 जून 2022 रोजीपर्यंत मराठवाडयातील लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजाच्या कडकडाटासह पाउस होण्याचे व या ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 की. मी. असण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत 

(.) त्या करीता नैसर्गिक आपत्‍तीचे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवून दर तासानी पडणा-या पावसाबाबत तसेच काही हानी झाल्यास त्‍याबाबत संदेश या जिल्हा कार्यालयास द्यावा (.) सदर कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शेतकरी/ नागरिक यांनी खबरदारी घ्यावी. विशेषतः शेतक-यांनी विजांचा कडकडाट होत असताना शेतीचे कामे करू नये. व आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वतः सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा. झाडाखाली, विद्युत खांब / तारा याजवळ थांबू नये. धातूचे वस्तू सोबत बाळगू नये. खुल्या मैदानात असाल तर उंच ठिकाणी न थांबता खोलगट जागेत एखादी लाकडी वस्तू पायाखाली ठेवून खाली बसावे. जलसाठ्याजवळ जाऊ नये, आपल्या मुलांना जलसाठ्यावर पोहण्यासाठी पाठवू नये, शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विध्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे, पुलावरून/नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूल / नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जाऊ नये. अशा सुचना निर्गमित करून आपण आपल्‍या तालुक्‍यातील नदी काठच्‍या गावाना सावधगीरीची सूचना देवून योग्‍य ती उपाययोजना करावी व तसा अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा (.) सदरच्‍या कालावधीत कोणीही आपले मुख्‍यालय सोडू नये- अपर जिल्हा दंडाधिकारी लातुर

Post a Comment

0 Comments