Latest News

6/recent/ticker-posts

निटूर येथे बस वळण्यासाठी जागा नसल्यामुळे बसस्थानकाचा प्रश्न ऐरणीवर

निटूर येथे बस वळण्यासाठी जागा नसल्यामुळे बसस्थानकाचा प्रश्न ऐरणीवर

ग्रामपंचायत प्रशासन पत्रव्यवहार करून जबाबदारी झटकून मोकळे


निलंगा
: तालुक्यात अनेक दिवसांपासून लातूर-जहीराबाद हायवेचे लातूर-निलंगा-औराद शहाजानी पर्यंत चे काम चालू होते. या काळात प्रवाशाचे मोठ्याप्रमाणात हाल झाले. आता हायवेचे काम पुर्ण झाल्यामुळे प्रवाशी आनंदात होते. त्यातच निलंगा तालुक्यातील निटूर हे मोठे गाव असून निटूर येथे राज्य महामार्ग झाल्यामुळे निटूर येथे बस थांबण्यासाठी व बस वळवण्यासाठी प्रवाशांना थांबण्यासाठी कसलीच सोय निटूर वर नाही. लातूर वरून निटूर मार्गावरून जाणाऱ्या बसेसला जाताना त्रास होत आहे. परंतु निलंगा निटूर मार्गे हालकी,  शिरूर अनंतपाळ, नळेगाव, नांदेड जाणाऱ्या बसेस ला निटूर मोडवरून निटूर गावात जाऊन वळुन माघारी मोडला यावे लागते.

 निटूर बस स्टॉप चौकात राज्य महामार्ग गेल्यामुळे, डिव्हायडर झाल्यामुळे बसेसला वळण्यासाठी जागा नाही की, प्रवाशानांना निवारा नाही. या कारणांमुळे निलंगा आगार प्रमुखांकडे बस चालकांनी तक्रार केल्यानंतर आगार प्रमुखांनी ग्रामपंचायत निटूर शी पत्रव्यवहार करून बस वळण्यासाठी व्यवस्था करावी अशी वारंवार विनंती केली असता बस वळ्यासाठीची व्यवस्था झाली नसल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अनेक दिवसांपासून निटूर मोडवरून जात असल्याने व प्रशासन मात्र एकमेकांना पत्रव्यवहार करून स्वताची जबाबदारी झटकत असल्यामुळे प्रवाशांत असंतोष पसरल्याचे पाहायला मिळत आहे. प्रशासनाने वेळेवर जर बसस्थानकाचा प्रश्न मिटवला नाही तर प्रवाशी आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

निटूर मोड वरून निटूर गावात जाण्यासाठी विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, बालक, महिला, पुरूष प्रवाशांचे हाल होत असल्याने निटूर जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी सुरेंद्र धुमाळ यांनी निलंगा आगाराला भेट देऊन जोपर्यंत कायमस्वरूपी व्यवस्था बसस्थानकाची व्यवस्था होत नाही तोपर्यंत प्रवाशांच्या सोयीसाठी निटूर येथुन वळणाऱ्या बसेस या एच पी गॅस च्या पुढे संपणाऱ्या रस्ता दुभाजकावर वळवुन प्रवाशांची सोय करावी अशी विनंती पवार यांच्याकडे केली असून अशी तात्पुरती व्यवस्था प्रवाशासाठी करावी लवकरच कायमस्वरूपी व्यवस्था करू असे पत्र ग्रामपंचायत निटूर ने दिल्यास बसेस निटूर गावात येतील असे बस आगार व्यवस्थापनाने सांगितल्याचे सुरेंद्र धुमाळ यांनी सांगितले. कायमस्वरूपी बसस्थानकांची व्यवस्था होईपर्यंत प्रवाशांना तात्पुरता दिलासा द्यावा अशी मागणीही आता प्रवाशांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments