Latest News

6/recent/ticker-posts

दूषित पाण्यामुळे होणारे साथरोग नियंत्रणासाठी भादा येथे क्लोरीन वॉश करणे सुरू

दूषित पाण्यामुळे होणारे साथरोग नियंत्रणासाठी भादा येथे क्लोरीन वॉश करणे सुरू

बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथे गेल्या चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे. साथ रोग पसरू नये याकरिता गुरुवार दिनांक 14 जुलै 2022 रोजी पाणीपुरवठा करणारे जलसाठे यामध्ये हातपंप इलेक्ट्रिक मोटर बोर आदी जल स्त्रोतामध्ये ब्लिचिंग पावडर टाकून क्लोरींग वॉश करण्यात आले.

यावेळी भादा ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्तपणे ही मोहीम राबविण्यात आली यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ महेश पवार, ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी, आरोग्य सेवक रवी कांबळे व कांबळे, सोमनाथ बनसोडे, ब्रम्हानंद स्वामी, हानमत दरेकर, मधुकर पडुळे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments