नायब सुभेदार पदोन्नतीबद्दल माधव चिद्रे यांचा कराटे खेळाडूंनी केला सत्कार
नायब सुभेदार पदोन्नतीप्रसंगी महाराष्ट्र विद्यालय निटूर येथे माधव चिद्रे यांचा अशिहरा कराटे असोसिएशन, लातूर व कराटे खेळाडूंकडून सत्कार करताना प्रमुख उपस्थित मान्यवर.
निटूर : अशिहरा कराटे असोसिएशन, लातूर यांच्या वतीने महाराष्ट्र विद्यालय निटूर येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले आणि नुकतेच नायब सुभेदार या पदावर पदोन्नत झालेले माधव चिद्रे यांचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी कराटेच्या खेळाडूंनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले आणि राष्ट्रनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा यांचे प्रतीक असलेले "आपले संविधान" हे पुस्तिकेचे भेटवस्तू स्वरूपात सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निटूरचे उपाध्यक्ष दिनकर(नाना) धुमाळ, अशिहरा कराटे असोसिएशनचे अध्यक्ष के. वाय. पटवेकर, निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती प्रतिनिधी दिलीप हुलसुरे, पत्रकार राजाभाऊ सोनी यांच्यासह कराटेचे खेळाडू उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले. माधव चिद्रे यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांचे आभार मानले.
0 Comments