धार्मिक अल्पसंख्यांक विभागाच्या अंतर्गत असलेल्या शाळा,महाविद्यालयांना अनुदान योजना
लातूर:(जिमाका) दि. 21 - धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित / विना अनुदानित / कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगीक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका / नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2022-23 साठी अल्पसंख्यांक विकास विभागाच्या शासन निर्णय दि. 7 ऑक्टोबर 2015 अन्वये “राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगीक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना” राबविण्यात येत आहे. सदर योजना राबविण्याबाबत अल्पसंख्याक विकास विभाग, परिपत्रकचे दि.15 जून 2022 रोजी अन्वये कळविण्यात आले आहे.
त्यानुषंगाने संस्थाचालकांनी या योजनेअंर्तगतचे प्रस्ताव दिनांक 7 ऑक्टोबर 2015 च्या शासन निर्णयाप्रमाणे विहित नमुन्यात रितसर परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय,बार्शी रोड, लातूर या कार्यालयात दि. 31 जूलै, 2022 दुपारी 5.00 वाजे पर्यंत सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत यांची कृपया नोंद घ्यावी, असे जिल्हा नियोजन अधिकारी म.श.दुशिंग यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
0 Comments