पोलीस ठाणे देवणी ची अवैध धंद्यावर कारवाई;देशी-विदेशी दारू सह एकूण 1,66,810/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत
लातूर: पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी, निलंगा डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे देवणी चे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याचे अनुषंगाने देवणी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून देवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
सदर पथक पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना दिनांक 27/01/2023 रोजी पथकास गोपनीय माहिती मिळाली की, बोळेगाव ते आळवाई जाणारे रोडवर एक ओमनी कंपनीच्या गाडी मधून देशी-विदेशी दारूची अवैद्य वाहतूक होणार आहे. त्यावरून पथकाने बोळेगाव येथे सापळा लावला असता थोड्याच वेळात बातमीप्रमाणे एक ओमनी कार क्रमांक एम.एच. 01 एन.ए.4661 अशी येताना दिसली. त्यावर पथकाने सदरची गाडी थांबून पाहणी केली असता त्यामध्ये बॉक्समध्ये वेगवेगळ्या लेबलची देशी/ विदेशी दारू असल्याचे निदर्शनास आले. त्यावर बेकायदेशीररित्या विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने दारूची चोरटी वाहतूक करणारा इसम नामे राजू विश्वास पारशेट्टी, राहणार बोळेगाव, तालुका देवनी जिल्हा लातूर त्याचे विरुद्ध पोलीस ठाणे देवणी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 26/2023 कलम 65 (अ)(ई) मुंबई दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनासह 1 लाख 66 हजार 810 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस ठाणे देवणी चे सहायक फौजदार कोडामंगले हे करीत आहेत. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे देवणी चे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, पोलीस अमलदार सहाय्यक फौजदार कोंडामंगले, बनाळे, डोईजड यांनी केली आहे.


0 Comments