Latest News

6/recent/ticker-posts

तीन दशकानंतर मिळाला जुण्या आठवणींना उजाळा, निटूरात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात, गुरूजनांचा ही सन्मान

तीन दशकानंतर मिळाला जुण्या आठवणींना उजाळा, निटूरात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात, गुरूजनांचा ही सन्मान


लातूर: तब्बल तीन दशकानंतर मा. विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा निटूर ता. निलंगा येथे ग्रामदैवत सादनाथ मंदिरामध्ये पार पडला या मेळाव्याला इ. स. 1992 साली दहावी उत्तीर्ण  झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी सह तत्कालीन शिक्षकांनी हजेरी लावली यामध्ये उपस्थित असलेल्या सर्व गुरू जनांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

निटूर ता. निलंगा येथे सादनाथ मंदिरात  रविवारी माजी विद्यार्थांचा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्व विद्यार्थ्यांसह गुरूजनांना निमंञीत करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी व विद्यार्थीनी ने आपापले परीचय करून देवून मनोगत ही व्यक्त केले अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना आपण शिक्षकांच्या छडीने कसे घडलो यावर भावनिक संवाद साधत गुरूजींच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही चांगल्या पदावर असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला ग्रामदैवत सादनाथ मंदिरामध्ये श्रीफळ वाढवण्यात आला व कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली या कार्यक्रमात अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी नी मनोगत  व्यक्त केले. तीस वर्षानंतर एकत्र आल्याने अनेकांनी ऐकमेकांची अस्थेवाईकपणे चौकशी करून संवाद साधला या कार्यक्रमामध्ये तत्कालीन शिक्षक रामेगावकर, बिराजदार सर तथा शिक्षक अभंग शिंदे सर यांनी मनोगत व्यक्त करून उर्वरीत आयुष्यासाठी स्नेह मेळाव्यास जमलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमाची सांगता भोजनाने करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा. विद्यार्थ्यांसह सर्वांनीच प्रयत्न केले होते.

Post a Comment

0 Comments