Latest News

6/recent/ticker-posts

भादेकर सावित्रीमाईची पहिली लेक झाली अभियंता; बनसोडे कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव

भादेकर सावित्रीमाईची पहिली लेक झाली अभियंता; बनसोडे कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथील शेतकरी अनिता आणि आण्णासाहेब बनसोडे यांनी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता मुलाप्रमाणे या मुलीस उभय दाप्त्यानी प्राथमिक शिक्षणापासूनच शिक्षण देण्यास सुरुवात केली यामुळेच सावित्रीमाईची भादा येथील  पहिली भादेकर लेक झाली अभियंता अशी चर्चा गावात सुरू आहे. यामुळे बनसोडे कुटुंबावरच अभिनंदनचा वर्षाव मोठ्या प्रत्यक्ष,फोनद्वारे,सोशल मीडियावर,फेसबुकवर मोठ्या प्रमाणात होत आहे. भादा ता औसा येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन पुढील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थिनीची अभियंतापदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

एका सामान्य कुटुंबातील शेतकरी आण्णासाहेब नागोराव बनसोडे याच्या कुटुंबातील कन्या कु. अश्विनी आन्नासाहेब बनसोडेची महाराष्ट्र राज्य शासनाच्या महापारेषण विभागात सहाय्यक अभियंता पदी  निवड झाली आहे. यामुळे या निवडीबद्दल भादेकर कन्या अश्विनीचे भादेकर सह सरपंच मिणाबई दरेकर, उपसरपंच बी एम शिंदे, ग्राम पंचायत सदस्य योगेश लटूरे,अमोल पाटील,सूर्यकांत लटूरे,तानाजी गायकवाड,सत्यशिला बनसोडे, सुनीता देडे, दिपाली उबाळे, राधा माळी, प्रभारी उपसरपंच तयब पठान,शिक्षक ,शाळा समितीकडून मनःपुर्वक अभिनंदन व्यक्त केले जात असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments