कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपाने नरेगा कार्यालयात शुकशुकाट
बी.डी.उबाळे
औसा: सध्या महाराष्ट्र मध्ये कंत्राटी नरेगा कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी संप पुकारल्याने तालुक्यातील नरेगा कार्यालयात शुकशुकाट जाणवून आला. कारण नरेगा कक्षामध्ये सतत असणारी गर्दी आणि गडबड ही या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पंचायत समितीतील कार्यालयामध्ये शुकशुकाट असल्याचे दिसून आले.
कारण या नरेगा कर्मचारी 2008 पासून कार्यरत असून यांच्या मानधनामध्ये महागाई प्रमाणे वाढ करण्यात आलेली नाही परंतु जबाबदारीची जिम्मेदारी मोठ्या प्रमाणात दिली आहे आणि कामाचा पण व्याप मोठ्या प्रमाणात असल्याने या कर्मचाऱ्यांना काम करणे आणि हे काम करीत असताना आवश्यक अशा कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण होत नाहीत. यामुळे यांची प्रमुख मागणी ही मानधनांमध्ये वाढ आणि दरवर्षी पगारामध्ये होणारे दहा टक्के ही वाढ पण कर्मचाऱ्यांच्या पगारात करण्यात आलेली नाही.
तर टी ए डी ए व इतर सुविधाही खूपच अपुऱ्या मिळत असल्याने या कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली असल्याची चर्चा असून या कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य असून त्या शासनाने पूर्ण कराव्यात अशी मागणी या कर्मचाऱ्याकडून करण्यात येत आहे याकरिता हा संप टप्प्याटप्प्याने सुरू असल्याचे समजते.


0 Comments