Latest News

6/recent/ticker-posts

युनिव्हर्सल पब्लिक स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात

युनिव्हर्सल पब्लिक स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात

औराद शहाजानी: युनिव्हर्सल पब्लिक स्कूल येथे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला शाळेकडून शाहूराज मोरे यांना आदर्श पालक म्हणून निवड करण्यात आली होती व त्या पालकाकडून शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला यावेळी मुलांनी देशभक्तीपर गीत पांचाल तनया, पाटील  मनिकरनिका, हंगरगे आदित्य, पाटील कीर्ती, अंचोळे राधिका, मेटे समृद्धी यांनी गायन केले

तर हाणेगावे भूमी, अग्रे रुचिका कांबळे संबोधी, भोसले प्रतिज्ञा, मनियार मुस्कान, बोबे प्रगती, माळी अभिषेक, स्वामी बसवेश्वर, भंडारे प्रिया, लासूने सुफियान, पाटील गौरी, मगनुरे वेदिका, भंडारे  पदमाक्ष, इंगळे हरीओम, जाधव रितेश, गट्टे प्रणिती यांनी देशभक्तीपर गीतावरती नृत्य सादर केले. गट्टे नियती ,पवार आरोही, रापशेट्टी सार्थक, पाटील आरोही, बिरादार आदिती, हंगरगे आदिती, कांबोज आदित्य, बिरादार प्रांजल्य, बागवान नेहा, गट्टे नियती ,मदने अनिकेत, शिंदे अंजली, धनश्री नयन, वलांडे जगदीश, देवनाळे मधीहा यांनी भाषण देशभक्तीपर भाषण दिले व त्यानंतर शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते त्या खेळातील उत्कृष्ट खेळाडूंना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भारत देशातील विविधतेतील एकतेचा दर्शन घडवत प्रत्येक राज्याची वेगवेगळी वेशभूषा घालून त्या राज्याच्या वैशिष्ट्ये बद्दल लोकांना माहिती दिली आणि प्रत्येक राज्याचे जेवण, तिथले पीक, लोकसंख्या, प्रसिद्धी आणि देशभक्त स्वातंत्र्य सेनानी याबद्दल माहिती देऊन प्रदर्शन भरवण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments