औशाचे तहसीलदार भरत सूर्यवंशी बांधावर भादा येथे ई पीक पाहनीचे प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना दाखविले
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील औसा तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी भादा शिवारातील सर्वे नंबर 138 मध्ये जाऊन शेतकऱ्यांना ईपीक पाहणी कशी आणि का? करायची याबाबत माहिती देऊन ती ई पीक पाहनी ऑनलाईन ॲप द्वारे कशी करायची याचे प्रात्यक्षिक स्वतः तहसीलदार यांनी करून दाखविले आणि त्याबाबत शेतकऱ्यांना यापुढे शासनाकडून कोणताही शेतकऱ्यांसाठी येणारा लाभ हा ऑनलाइन पद्धतीने येणार असल्याने ही ई पीक पाहणी स्वतः शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे याचे महत्त्वही त्यांनी प्रत्यक्ष ई पिक पाहणी करून सांगण्यात आले.
यावेळी भादा सज्जाचे तलाठी राम दूधभाते आणि संबंधित शेतकरी यामध्ये आनंद गायकवाड, रवींद्र गायकवाड, ग्राम पंचायत सदस्य सूर्यकांत उबाळे, अनुरथ उबाळे, सत्यवान उबाळे, महादेव उबाळे, सहदेव घोडके, हसन शेख, चंद्रकांत पाटील व इतर शेतकरी प्रत्यक्ष ई पिक पाहणी स्थळी उपस्थित होते.


0 Comments