विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन- निजामुद्दीन शेख
शेख बी जी
औसा: दि. 27 - येथील अजीम प्राथमिक व माध्यमिक विद्यालययात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना प्राध्यापक व शाळेचे मुख्याध्यापक निजामुद्दीन शेख यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, विद्यार्थ्यांतील कलागुणांचा विकास करण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येत असते. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी यात आपला सहभाग नोंदवून आपले कला गुण दाखवावे. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, सचिव तथा माजी नगराध्यक्ष अफसर शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश सचिव सुलेमान शेख, पर्यवेक्षक दानिश शेख, अरब गझाला, शेख परविन, पत्रकार जलील पठाण, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या वेगवेगळ्या कला सादर करून दाखवल्या यात वेगवेगळ्या गीतावर नृत्य सादर केली, छोटे छोटे विनोद सादर केले. शेवटच्या गीतावर या ठिकाणी उपस्थित शिक्षकासह सर्वांनी नृत्य सादर करून आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तत्तापुरे करीम, मेटे खलील सिद्दीकी, समीरखान पठाण आदिनी केले.


0 Comments