Latest News

6/recent/ticker-posts

ऑर्बीट प्री-प्रायमरी इंग्रजी शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

ऑर्बीट प्री-प्रायमरी इंग्रजी शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

औसा:(प्रतिनिधी) दि. 26 जानेवारी रोजी ऑर्बीट प्री-प्रायमरी इंग्रजी शाळेत "प्रजासत्ताक दिन" उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इस्माईल सरगुरु तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ॲड.समियोद्दीन पटेल, डॉ.आर.आर.शेख, ॲड. फय्याज सय्यद, डॉ.शोएब सुलतानी, मुजम्मील शेख, आमिर पटेल, फहीम शेख, संस्थेचे अध्यक्ष शेख रसुलसाब गुरुजी यांची उपस्थिती होती. ध्वजारोहण ॲड.समियोद्दीन पटेल यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षिका सुमैय्या शेख यांनी केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर विध्यार्थ्यांचे देशभक्तिपर भाषणे झाली. त्यामध्ये सर्वांचे लक्ष लहान मुलांच्या भाषण स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाने वेधले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धा मधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन अमूल्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास ॲड.मजहर शेख, निजाम शेख, सिद्दीकी चाँदभाई, पत्रकार आसिफ पटेल, इंजि.अजहर शेख, आसेफ शेख, इंजि.शहबाज शेख,अमन शेख, परवेज शेख, मजहर पटेल, अरबाज शेख,ॲड.इकबाल शेख, "मराठी अस्मितेचा इशारा" वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक प्रा. बी.जी.शेख, नजीरुल्ला हाश्मी, जावेद कच्ची, कुर्बान शेख, अबूबकर सिद्धीकी सह शाळेतील सर्व शिक्षिका,विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शेख अंजमुनेहा इकबाल, सहशिक्षिका पठाण तहेनियत, सय्यद आयेशा, बुशरा पंजेशा, तरंन्नूम पटेल, शेख सुमैय्या, उमर शेख यांनी परिश्रम घेतले. शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन आभार प्रदर्शन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका आयेशा सय्यद यांनी केले तर आभार डॉ.शोएब रहिमोद्दीन शेख यांनी मानले.

Post a Comment

0 Comments