नळेगावकरांनी अनुभवला मल्लखांबाचा थरार
नळेगाव: दि. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय नळेगाव येथे सार्वजनिक ध्वजारोहणानंतर जिल्हा परिषद प्रशाला नळेगावच्या विद्यार्थ्यांनी प्रेक्षणीय मल्लखांबाच्या कसरती केल्या.
या कसरती पाहून नळेगावकरांनी प्रथमच कसरतीचा थरार अनुभवला. या कसरती मध्ये मैनुद्दीन सय्यद, सोहेल कोतवाल, अंबादास जोगदंड, कृष्णा जोगदंड, अजमेर कोतवाल, रमजान मुजावर, अपनान कुरेशी, मोहम्मद सय्यद, संस्कार शृंगारे, जियान कुरेशी, ओम शिरसागर, कैफ कुरेशी, गौरव शृंगारे, अफाम मुजावर या विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन उपस्थितीयासमोर मलखांबाच्या प्रात्यक्षिक करून उपस्थितीयांची दाद मिळवली. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लक्ष्मण बेल्हाळे, व किरण कांबळे यांचे लाभले.


0 Comments